अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी महिला आणि तिच्या मुलाचा प्रभाग समितीच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी मनोरमानगर येथील महिला आणि तिच्या मुलानं माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं महापालिकेच्या सुरक्षा रक्षक आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचा-यांनी धाव घेत दोघांनाही पकडून ठेवल्यानं मोठा अनर्थ टळला. माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील मनोरमानगर परिसरात एका आदिवासी महिलेची जागा असून त्याठिकाणी महिलेनं अनधिकृत बांधकाम केलं होतं. याबाबत आदिवासी महिलेनं महापालिकेकडे तक्रार केली. त्यामुळं पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं या बांधकामाची पाहणी करून बांधकाम थांबवलं होतं. जोपर्यंत संपूर्ण प्रकरण स्पष्ट होत नाही तोपर्यंत बांधकाम करता येत नाही असं पालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं होतं. तरीही बांधकाम तोडू नये यासाठी धमकावत काल संध्याकाळी चार च्या सुमारास ही महिला आपल्या मुलासह प्रभाग समिती कार्यालयामध्ये धडकली. त्यानंतर संतापलेल्या या महिलेनं थेट प्रभाग समितीमध्ये जाऊन गोंधळ घातला. अधिका-यांना भेटू दिलं जात नसल्यानं तिने आणि मुलानं स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील सुरक्षारक्षक आणि अतिक्रमण कर्मचा-यांनी रॉकेल ओतून घेतलेल्या मुलाला पकडून ठेवले तर महिलेला इतरत्र हलवले. पोलीसांनी या महिलेसह तिचा मुलगा निखिल गुप्ता अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातही तिने किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading