कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान महिला लोकलमधून पडून गंभीर जखमी

कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान कलावती यादव ही महिला लोकलमधून पडून गंभीर जखमी झाली आहे. काल दुपारी ही दुर्घटना घडली. कलावती यादव यांना आधी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना तातडीनं सायन रूग्णालयात हलवण्यात आलं. त्या नेमक्या कोणत्या उपनगरीय गाडीतून पडल्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्या नर्स म्हणून काम करत असल्याचं समोर आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading