ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या म्हणजे २२ मे रोजी सकाळी ९ पासून २३ मे रोजी सकाळी ९ पर्यंत २४ तास बंद राहणार आहे. पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी हा पाणी पुरवठा २४ तास बंद राहणार आहे. यामुळं घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा, कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.