महापालिकेतर्फे यंदाही गणेशोत्सवादरम्यान फिरती विसर्जन व्यवस्था

ठाणे महापालिकेनं यंदाही फिरती गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्यासंदर्भातच्या सूचनेनुसार नागरिकांनी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी घराबाहेर पडू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाही शहरात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

ठाणे शहरात विविध ठिकाणी धूर, औषध फवारणी

शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर, औषध फवारणी सुरु आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी करण्यात येत आहे.

Read more

कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेशमंडळाचे मंडप भाडे माफ

कोविडच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करु नये असे शासनाचे निर्देश असल्याने सर्वच गणेशमंडळांना आर्थ‍िक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या गणेशमंडळांना दिलासा मिळावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आकारण्यात येणारे मंडपभाडे पूर्णपणे माफ करण्यात आले असल्याची माहिती महापौर आणि आयुक्तांनी दिली.

Read more

पाऊस आणि सणासुदीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणे महापालिका क्षेत्रात सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी पावसाळयात तसेच सणासुदीच्या काळात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजहित लक्षात घेवून यंदाही दीड दिवसांचा साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन यांनी आज झालेल्या बैठकीत सांगितले.

Read more

ठाणे महापालिकेला लवकरच मिळणार वाढीव 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा

ठाणे महापालिकेच्या सद्यस्थ‍ितीत भातसा धरणातून होत असलेल्या 200 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठ्यामध्ये 100 द.ल.लि वाढ करण्यासाठी नवीन पंपीग मशीन पिसे येथे बसविण्यात येत आहे. जुने पाच पंप हे 600 अश्वशक्तीचे होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे (1150 अश्वशक्तीचे) पाच पंप नव्याने बसविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला 100 द.ल.लि प्रतिदिन वाढीव पाणी मिळणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज पिसे टेमघर प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान नमूद केले.

Read more

रुस्तमजी अर्बनिया कडून महापालिकेला दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने भेट

भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रुस्तमजी अर्बनियाच्या टीमने महापालिकेला दोन अत्याधुनिक अग्निशमन वाहने भेट दिली आहे.

Read more

मराठा समाजासाठी वसतीगृह उभारणारी ठाणे ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका – पालकमंत्री

शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यात उभारण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृह हे महाराष्ट्रातील पहिले वसतीगृह असल्याचे उद्गगार पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले.

Read more

नैसर्गिक आपत्तीमध्ये ठाणे महापालिकेच्या विविध पथकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते विशेष गौरव

महाड तसेच चिपळूण परिसरात पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ठाणे महापालिकेच्या विविध पथकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरिष्ठ अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून विशेष गौरव करण्यात आला.

Read more

ठाणे महापालिकेत महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण

भारताचा 74 वा स्वांतत्र्य दिन महापलिकेच्या वतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Read more