पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण

गर्डरचे लाँचिंग करण्यासाठी दिवसभरात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्याच दृढनिश्चयामुळे या अडचणींवर मात करून गर्डरचे यशस्वीपणे लाँचिंग झाल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली तसेच यापुढील दुसऱ्या गर्डरसह ऍप्रोच रोडचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिल्या.

Read more

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम 90 टक्के पूर्ण – उर्वरित कामासाठी उद्या रात्री पुन्हा मेगाब्लॉक

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम आज 90 टक्के पूर्ण झाले. उर्वरित 10 टक्के कामासाठी तसेच पुलाच्या नियोजित कामात खंड पडू नये यासाठी खासदार शिंदे यांनी तत्काळ मेगाब्लॉक देण्याची विनंती रेल्वे डीआरएमकडे केली होती त्यानुसार रेल्वेकडून सोमवार तारीख 23 नोव्हेंबर रोजी रात्री मेगाब्लॉक निश्चित करण्यात आला आहे अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Read more