पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण

गर्डरचे लाँचिंग करण्यासाठी दिवसभरात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. मात्र सर्वांच्याच दृढनिश्चयामुळे या अडचणींवर मात करून गर्डरचे यशस्वीपणे लाँचिंग झाल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली तसेच यापुढील दुसऱ्या गर्डरसह ऍप्रोच रोडचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिल्या. आज मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येऊन पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे उर्वरित 10 टक्के कामही पूर्ण करण्यात आले. अंतिम टप्प्यात आलेल्या या पुलाचा सर्वात कठीण आणि तितकाच महत्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे हे स्वतः गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते. पत्रीपुलाच्या सर्वात मोठ्या अशा 76 मीटर गर्डर लाँचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबरला मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला. यातील पहिल्या दिवशी 22 नोव्हेंबरला या गर्डरचे नियोजित 40 मीटर ढकलण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. तर 22 तारखेला मेगाब्लॉक सुरू होण्यास झालेल्या विलंबामूळे 90 टक्केच काम होऊ पूर्ण शकले. उर्वरित 10 टक्के कामासाठी पुन्हा रेल्वेच्या विशेष ब्लॉकची आवश्यकता होती. रेल्वे प्रशासनानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मध्यरात्री 1.30 मिनिटे ते 3 वाजण्याच्या सुमारास विशेष ब्लॉक मंजूर केला. गर्डर लाँचिंगचा अत्यंत महत्वाचा टप्पा पार पडल्याने सर्वांनी एकच जल्लोष केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading