महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दिवा परिसराला वाढीव पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ

दिवा परिसरामधील वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेवून दिवा शहराला दैनंदिन 6.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पुरविणेबाबतचे आदेश दिले होते, त्यानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करुन दिव्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपासून वाढीव पाणीपुरवठा देण्यास सुरूवात केली आहे.

Read more

एमआयडीसीकडील प्रलंबित प्रकरणांचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

ठाणे महापालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन महापालिका आयुक्तांनी समूह विकास योजनेसाठी अतिक्रमित जागा उपलब्ध करून देणे, जलकुंभ, वाहनतळासाठी खुली जागा आणि रूग्णालयासाठी सुविधा भूखंड अशा विविध विषयांवर महामंडळाच्या अधिका-यांशी चर्चा केली.

Read more