रूणवाल गार्डन सिटी प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा

रूणवाल गार्डन सिटी मध्ये परांची कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बाळकूम येथील रूणवाल गार्डन सिटीमधील रेल्वे कामासाठी लावलेली परांची कोसळल्यामुळं झालेल्या अपघातात ८ कामगार गंभीर जखमी झाले होते. ही परांची रूणवाल गार्डन सिटी फेज १ ए आणि २ या इमारतींना लावण्यात आली होती. काल या परांची काढण्याचं काम सुरू होतं. मात्र ही परांची काढताना कामगारांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेण्यात आली नव्हती. दीड-दोन वर्षापासून ही परांची येथेच असल्यामुळं परांचीचे बांबू कुजले होते. कोणतीही तपासणी न करता कामगारांना ही परांची उतरवण्यासाठी चढवण्यात आल्यानं निष्काळजी आणि हयगय केल्याबद्दल पोलीसांनी संग्राम कुंभार आणि अजमल हुसेन अशा दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: