महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन

महापालिका क्षेत्रात राबवण्यात येणा-या मिझेल रूबेला लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं मिझेल रूबेला लसीकरण मोहिम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पालिका कार्यक्षेत्रातील खाजगी तसंच महापालिका शाळेतील १ हजाराहून अधिक मुख्याध्यापक, नोडल शिक्षक, प्रतिनिधी या कार्यशाळेत उपस्थित होते. या कार्यशाळेत या मोहिमेबाबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी लसीकरणासंदर्भात उपस्थित केलेल्या अडचणी आणि शंकांचे पालिकेचे मुख्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी निराकरण केले. मिझेल रूबेला  आजारांपासून संरक्षण व्हावं म्हणून ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचे या मोहिमेअंतर्गत लसीकरण केलं जाणार आहे. ही लसीकरण मोहिम शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र स्तरावर राबवण्यात येणार आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading