नोकरी लावण्याच्या आमिषाखाली एका व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक

एचडीएफसी बँकेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून श्रद्धा गायकवाड या महिलेने ठाण्यातील 47 वर्षीय व्यक्तीची अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते मार्च 2018 या कालावधीत घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोलबाड नाका येथे राहणारे मनीष जाधव यांनी त्यांचे मेव्हणे राजेंद्र मिरजकर यांच्या परिचयातील श्रद्धा गायकवाड या महिलेशी नोव्हेंबर 2017 मध्ये नोकरीसाठी संपर्क साधला होता. तिनेही आपण एचडीएफसी बँकेत कामाला असल्याचे भासवून बँकेत नोकरी लावण्यासाठी दोन लाख अनामत असे अडीच लाख उकळले. मात्र नोकरी न लावता रक्कमही परत केली नाही. तिने दिलेले धनादेशही वटले नसल्याने अखेर जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पी. डी. लोंढे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: