लाच स्वीकारताना पकडला गेलेला पोलीस कॉन्स्टेबल लाचेची रक्कम घेऊन पळून जाण्याचा प्रकार

लाच स्वीकारताना पकडला गेलेला पोलीस कॉन्स्टेबल लाचेची रक्कम घेऊन पळून जाण्याचा प्रकार घडला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तक्रारदाराच्या तक्रारीनंतर सापळा रचला होता. अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करणारे पद्माकर अस्वले यांनी एका भंगार विक्रेत्याकडे दरमहा ८० हजार रूपयाची लाच मागितली होती. त्याच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून अस्वले यांनी ही मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यानंतर अस्वले यांना रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. तक्रारदारानं ठरल्याप्रमाणे ५० हजार रूपयाची रक्कम अस्वले यांना दिली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी अस्वले यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अस्वले यांनी पकडण्यास आलेल्या अधिका-यांना धक्का देऊन ५० हजार रूपयांच्या रक्कमेसह दुचाकीवरून पोबारा केला.

Leave a Comment

%d bloggers like this: