ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची खासदार राजन विचारेंची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात रेल्वेवरील चर्चेदरम्यान खासदार राजन विचारे यांनी ही मागणी केली. इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं १२५३ रेल्वे स्थानकांचा आदर्श स्टेशन योजनेतून विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ठाण्याला जागतिक स्थानकाचा दर्जा देण्याची मागणी केली. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्थानक असं लेबल लावलं जाणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी विचारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. ठाणे रेल्वे स्थानकात दोन्ही दिशांना असणा-या पादचारी पूलांची रूंदी ६ मीटरनं वाढवण्यात आली आहे. फलाट क्रमांक ५, ६, ९, १० या फलाटांची कामं, वातानुकुलित शौचालय तसंच रेल्वे स्थानकात उद्वाहन आणि सरकते जिने बसवण्यात आले आहेत. पार्कींग प्लाझाच्या इमारतीवर एक मजला वाढवण्याची योजना असल्याचं रेल्वे राज्यमंत्र्यांनी यावेळी उत्तर देताना सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading