​५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘टीजेएसबी’ बँकेचा ५०व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा

५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘टीजेएसबी’ बँकेचा ५०व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा झाला. टी.जे.एस.बी. सहकारी बँक ५ फेब्रुवारी रोजी ५० वर्षे पूर्ण करत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने बँकेच्या निवृत्त कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला. या निमित्तानं बँकेतील ५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होते. १९७२ साली बँकेची स्थापना झाली त्या सुरुवातीच्या काळापासून बँकेत काम केलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते २०२१ मधे सेवानिवृत्त झालेले अलिकडील निवृत्त कर्मचारी, आणि सध्या सेवेत असलेला तरुण कर्मचारी वर्ग या सर्वांना एकत्र आणण्याची कल्पना बँकेने प्रत्यक्षात आणली. सुंदर सुगंधी सोनचाफ्याची फुले देऊन प्रत्येकाचे स्वागत करण्यात आले आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ह्या ५० कर्मचाऱ्यांच्या रुपात जणूकाही बँकेचा ५० वर्षांचा चालता बोलता इतिहासच प्रकट झाला होता. या सर्वांनी सांगितलेल्या जुन्या आठवणींतून पुन्हा एकदा जुना काळ जिवंत झाला. बँकेत चांगले करिअर करण्याचे आणि भविष्य घडवण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहात असाल तर टीजेएसबी बँक ही अगदी योग्य जागा आहे जिथे तुम्ही आज आहात असे प्रतिपादन सतीश कोरान्ने यांनी नवीन कर्मचाऱ्यांना उद्देशून केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading