बारावी कॉमर्स – सायन्स विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने शहरातील १२ वी कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही विनामूल्य बोर्ड पद्धतीने सराव परीक्षेचे आयोजन केले आहे. परीक्षेचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी १००० ते १२०० विद्यार्थी सराव परीक्षेमध्ये सहभागी होतात. १६ जानेवारीला परीक्षा सुरु होणार असून शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थांनी या सराव परीक्षेत सहभाग घ्यावा असे आवाहन केळकर यांनी केलं आहे. सराव परीक्षेत सहभागी होण्याकरिता बी. पी. डी. रोड, विष्णु नगर, नौपाडा या ठिकाणी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत १४ जानेवारी पर्यन्त फॉर्म मिळतील. परीक्षा ब्राम्हण शिक्षण मंडळ (इंग्रजी माध्यम) आणि महाराष्ट्र विद्यालय, दगडी शाळे जवळ होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading