५-२-२ अंतर्गत, त्रयस्थ पक्षाकडून परिक्षण झाल्याशिवाय देयक न अदा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ५-२-२ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचे त्रयस्थ पक्षाकडून परिक्षण झाल्याशिवाय देयक अदा करू नये असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी बोलवलेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जी विविध कामं करण्यात आली आहेत ती कामं मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे मंजूर आराखड्यानुसार करण्यात आली आहेत की नाही याची त्रयस्थ पक्षाकडून पडताळणी करूनच देयकं अदा करावीत असे स्पष्ट केले. जॉईंट व्हेन्चर कामांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा दर्जा आणि त्याअनुषंगानं प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर यापुढे सरसकट प्रत्येक निविदेमध्ये जॉईंट व्हेन्चरची अट रद्द करून ती फक्त विशेष कामासाठीच वापरावी असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. या बैठकीत पालिका आयुक्तांनी वसुलीचा आढावा घेऊन प्रत्येक विभाग प्रमुखांना उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading