ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात एकूण ४३० मतदान केंद्रांपैकी ३७७ आणि ३७८ ही दोन महिला केंद्र असणार आहेत. या मतदारसंघात २ लाख ४३ हजार ८१५ पुरूष मतदार तर २ लाख ३ हजार ७०४ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात ३ लाख ९२ हजार १७१ छायाचित्रासह मतदान तर ३ लाख ९६ हजार ३७८ ईपिक मतदार आहेत. ४३० मतदान केंद्रांपैकी ३९१ मतदान केंद्र तळमजल्यार तर ९१ मतदान केंद्र ही पहिल्या मजल्यावर आहेत. या मतदारसंघात ८०३ दिव्यांग मतदार असून निवडणूक प्रक्रियेसाठी २ हजार ८३८ अधिकारी आणि कर्मचा-यांची आवश्यकता लागणार आहे. आपलं नाव मतदारयादीत असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सतिश बागल यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading