४ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज ४ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून एकाविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील जीवदानी नगर वैभव ढाब्याच्या मागील तळ अधिक २ मजले व्याप्त असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील वाढीव बांधकामचे एकुण २१ आरसीसी कॉलम तोडण्यात आले. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समिती १, नौपाडा प्रभाग समिती १ आणि कळवा प्रभाग समितीमधील १ वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलीत. दिवा प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी रमेश भगत यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading