ठाण्यातील प्रताप चित्रपटगृह आता इतिहासजमा

ठाण्यातील प्रताप चित्रपटगृह आता इतिहासजमा झालं आहे. कोलबाड परिसरात असलेलं हे चित्रपटगृह गेली अनेक वर्ष बंद होतं. या चित्रपटगृहात उत्तमोत्तम इंग्रजी चित्रपट पूर्वी प्रदर्शित केले जात होते. मात्र मल्टीस्क्रीनच्या जमान्यात सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांना घरघर लागली. त्यामध्ये ठाण्यातील हे चित्रपटगृहही सापडलं. गेले अनेक वर्ष या चित्रपटगृहात चित्रपट लागत नव्हते. हे चित्रपट खंडहर झालं होतं. काल हे चित्रपटगृह तोडण्यास सुरूवात करण्यात आली. आता बहुधा या चित्रपटगृहाच्या जागी एखादं टोलेजंग गृहसंकुल उभारलं जाईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading