लोकमान्यनगर येथील खचलेल्या रस्त्याची महापौरांनी केली पाहणी

लोकमान्य नगर येथील बस डेपो जवळील रस्ता काल सकाळी खचला. त्यानंतर महापौरांनीं तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी या रस्त्याच्या कामासाठी वाहतूक विभागाची परवानगी घेवून हा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण पध्दतीने नव्याने बांधण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. लोकमान्य बसडेपोजवळील रस्ता हा 40 वर्षे जुना आहे, या रस्त्यावरुन सातत्याने अवजड वाहतूक होत आहे. आजवर केवळ दुरूस्तीची कामे करुन रस्ता पूर्ववत करण्यात येतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता वारंवार खचत आहे. काल सकाळी रस्ता खचल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. परंतु रस्ता खचल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी दौ-यानंतर महापौरांनी तातडीने याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेतली. या बैठकीत विविध कामांबाबत चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत रोड नं. 22 चे काम सुरू असल्याने एकाच वेळी दोन्ही रस्त्याचे काम करणे वाहतुकीच्या दृष्टीने शक्य नाही. यासाठी इंदिरानगर नाका ते संतज्ञानेश्वर नगरपर्यतचा रस्ता वाहतुकीस मोकळा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कामे करण्याबाबत महापौरांनी आदेश दिले. तसेच ठिकठिकाणी तुटलेली ड्रेनेजची चेंबर्स दुरूस्त करणे, ज्ञानेश्वर नगर नाक्यावरील चौकातील काम करणे, कामगारनाका येथील पॅनिग पध्दतीने तयार करावयाच्या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्याबाबतचे आदेशही देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading