३०वर्ष जुन्या सोसायटीचे दोन दशकाहून अधिक काळ पाणी बील वसूल केले नसल्याचं उघड

30 वर्ष जुन्या सोसायटीला 25 वर्षाचे १९ लाख रूपयांचे थकीत पाणी बिल महापालिकेनं पाठवलं असून यामुळं दोन दशकाहून अधिक काळ या सोसायटीचे पाणी बिल वसूलच करण्यात आले नसल्याचा सावळा गोंधळ समोर आला आहे. कोपरी पूर्व परिसरातील श्रमदान को-ऑप सोसायटीला पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाठविले 19 लाखाचे बिल पाठवले आहे. सोसायटी सदस्यांना स्वतंत्र पाणी बिल द्या अशी मागणी वारंवार केल्यानंतर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाला आदेश दिल्यानंतरही अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी आता 19 लाखाचा थकीत बिल भरायचं कसं असा प्रश्न सोसायटीच्या सदस्यांना प्रश्न पडला आहे. दुसरीकडे मात्र पालिका पाणी पुरवठा विभागाने झोपी गेलेला जागा झाल्याप्रमाणे 19 लाखाचं पाणी बील पाठवून व्याजावर व्याज वर लावण्यात आल्याचे दिसत आहे. सोसायटीच्या काही सदस्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे अनेकवेळा लेखी निवेदन देऊन पाणी बिल प्रत्येक सोसायटी सदस्यांना त्यांच्या नावावर व्यक्तिगत देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे सोयीनुसार ज्यांना पाणी बिल भरायचे आहे ते भरतील त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसूल वाढेल. कोपरी पूर्व परिसरात सोसायटीच्या सदस्यांनी मागणी केल्यानुसार त्यांच्या नवे पाणी बिल मिळते मात्र श्रमदान सोसायटीद्वारे वारांवारच्या मागणीनंतरही पाणीपुरवठा विभाग किंवा पालिका आयुक्त कुठलीच दाखल घेत नसल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading