२५व्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद आणि खेलो इंडिया राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंची पदकांची लयलूट

नुकत्याच झालेल्या २५व्या कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आणि खेलो इंडिया राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ठाण्यातील खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे या दोन खेळाडूंनी ८ सुवर्ण, ३ रौप्य तर ३ पदकंही मिळवली आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचं सांघिक विजेतेपदही पटकावलं आहे. संयुक्ता काळे हिनं ५ सुवर्ण, १ रौप्य, किमया कार्ले हिने १ सुवर्ण, २ रौप्य, ३ कांस्य तर रिया खिलारेनं १ सुवर्ण पदक पटकावलं आहे. खेलो इंडिया निवड चाचणी स्पर्धेत अस्मि बदाडे, समिका ठोंबरे, स्पृहा साहू, अन्वी नार्वेकर यांची निवड झाली आहे. यातील पदक विजेते खेळाडू हे पूजा आणि मानसी सुर्वे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading