कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावे याकरिता राज्य शासनाने वेब पोर्टल विकसीत केले असून अर्जदाराने mahacovid19relief.in वर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय जाहीर झाला होता. त्यानुसार ऑनलाईन वेब पोर्टल विकसित करण्यात आलं असून त्याद्वारे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading