शहरात साथरोग उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी धूर आणि औषधफवारणी

शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर व औषध फवारणी सुरु आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये माहे नोव्हेंबर 2021 मध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या 46 आणि निश्चित निदान केलेले एकही रुग्ण नाही. तसेच मलेरियाचे माहे नोव्हेंबर 2021 मध्ये फक्त 70 रुग्ण आढळुन आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने शहरात गृहभेटी देवून तपासणी करण्यात येत असून एकुण 35599 घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1423 घरे दुषित आढळुन आली. तसेच एकुण 52800 कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी 1504 कंटेनर दूषित आढळुन आले. यापैकी 496  दुषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले. तर950  दूषित कंटेनर रिकामे करून 07कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले. दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रात 90 हॅण्डपंप, 10 ट्रॅक्टर्स, 6 ई-रिक्षा, 8 बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात 1818 ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीनव्दारे 11069 ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading