२१ ऑक्टोबरच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं आणि आस्थापना वगळून सर्वांना मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी वेतन कपात करू नये, अत्यावश्यक सेवा, दुकानं आणि आस्थापना वगळून सर्व आस्थापना मतदानाच्या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ बंद ठेवाव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. मतदानाकरता सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याची तक्रार आल्यास त्याविरूध्द कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading