विधानसभा निवडणुकीसाठी ठाण्यात बंदोबस्तासाठी ९ हजार पोलीस

विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार असून यासाठी ९ हजार पोलीसांची नियुक्ती होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात विधानसभेचे १३ मतदारसंघ येतात. जिल्ह्यामध्ये १८ मतदारसंघात २१३ उमेदवार रिंगणात आहेत. या १८ मतदारसंघापैकी १३ मतदारसंघ हे ठाणे पोलीस आयुक्तालयात येतात. या १३ मतदारसंघात ४ हजार १६५ मतदान केंद्र आहेत. याठिकाणी निवडणूक शांततेत आणि पारदर्शीपणे व्हावी याकरिता मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, ४ अतिरिक्त आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त, १२०० गृहरक्षक दलाचे जवान, १३ अर्धसैनिक दलाच्या तुकड्या असा ९ हजारांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. १२०० गृहरक्षक दलाचे जवान, २ पोलीस उपायुक्त, ८ सहाय्यक पोलीस आयुक्त, १० पोलीस निरिक्षक, १८ सहाय्यक पोलीस निरिक्षकांसह पोलीस उपनिरिक्षक बाहेरून बंदोबस्ताला येणार आहेत. तर ठाणे पोलीस आयुक्तालयातील १ हजार पोलीस कर्मचारी इतरत्र बंदोबस्ताला जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading