हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरून नेणा-या चोरट्यांना अवघ्या १२ तासात गजाआड करण्यात वागळे पोलीसांना यश

वागळे पोलीसांनी ६ लाख ८५ हजार रूपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरून नेणा-या चोरट्यांना अवघ्या १२ तासात गजाआड करण्यात यश मिळवलं आहे. भावेश मिरगनानी हे आशर येथे राहतात. त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप उघडून घरातील ६ लाख ८५ हजारांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वागळे पोलीसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक महिला संशयास्पदरित्या फिरताना दिसली. तिची माहिती काढली असता ही महिला मिरगनानी यांच्याकडे घरकाम करत होती. या महिलेची मिरगनानी यांच्याकडे काहीच माहिती नव्हती. तिचा मोबाईलही बंद होता. पोलीसांनी टॉवर लोकेशनवरून तिचा तपास केला असता ती लोकमान्यनगर परिसरात राहत असल्याचं निष्पन्न झालं. लोकमान्यनगर परिसरात या महिलेचा शोध घेतला जात असताना मिरगनानी यांच्या चोरीच्या ऐवजातील मनगटी घड्याळ एका लहान मुलाच्या हातात दिसले. या मुलाचा पोलीसांनी मागोवा घेतला असता संशयित महिला तिच्या मूळ गावी ओडिसा येथे जात असल्याचं लक्षात आल्यावर पोलीसांनी तिला पकडले. पोलीसांनी पकडल्यावर तिने चोरीची कबुली दिली. मिरगनानी यांच्या घराची एक चावी तिच्याकडे होती. त्या चावीचा वापर करून तिने मिरगनानी यांचे दागिने चोरून नेले. पोलीसांनी हे दागिने तिच्याकडून हस्तगत केले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading