एलएसडी पेपर हा पार्टी ड्रग्ज विक्री करणा-या व्यक्तीस अटक

एलएसडी पेपर हा पार्टी ड्रग्ज विक्री करणा-या व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक वर्तकनगर परिसरात गस्त घालत असताना कॅडबरी जंक्शन जवळ एक व्यक्ती पोलीसांना पाहून पळून जाताना दिसली. म्हणून या पथकानं त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीनं पकडलं. त्यानं हितेश मल्होत्रा असं नाव सांगून दोस्ती विहारमध्ये राहत असल्याचं पोलीसांना सांगितलं. पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सव्वा लाखांचा एलएसडी हा पार्टी ड्रग्ज आणि इतर वस्तू आढळून आल्या. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता २ लाख ६० हजार रूपयांचे १३ एलएसडी पेपर आणि १ किलो चरस पोलीसांनी जप्त केले. त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading