हिरानंदानी आणि शेठ बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोघा माजी नगरसेवकांसह माहिती अधिकार कार्यकर्त्याला न्यायालयीन कोठडी

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी बिल्डर आणि शेठ बिल्डर यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघा माजी नगरसेवकांसह माहिती अधिकार कार्यकर्त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. माहितीचा अधिकार वापरून बांधकाम व्यावसायिकांकडे पैशांची मागणी करणा-या २ माहिती अधिकारात काम करणा-या कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवकाला खंडणी विरोधी पथकानं अटक केली होती. त्यानंतर दुस-या दिवशी प्रमोद पाटील यांना अटक करण्यात आली. त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली. अशाप्रकारे अटक सत्र आणि चौकशीचा ससेमिरा सुरूच होता. खंडणी विरोधी पथकानं अटक केलेले माहिती अधिकार कार्यकर्ते शौकत मुलानी आणि आरिफ इलाकी यांची न्यायालयानं जामिनावर मुक्तता केली आहे. मात्र माजी नगरसेवक सुधीर बर्गे, राजकुमार यादव आणि प्रदीप पाटील यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं ते खंडणी विरोधी पथकाच्या कोठडीत होते. या तिघांना न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading