हायस्कूलची फी वाढ केल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी उपमुख्याध्यापिकेला धरले धारेवर

उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांना याची तक्रार केल्यानंतर गायकवाड यांनी या शाळेच्या प्रशासनाची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार गायकवाड यांच्यासोबत काही पालक उपस्थित होते. शाळेच्या उपमुख्याध्यापिकांनी तुमच्या सोबत आलेल्यांना बाहेर पाठवा, तुमच्या एकट्यामध्ये बोलण्याची हिंमत नाही का असा दम चक्क भाजपा आमदारांनाच दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या गणपत गायकवाड यांनी या उपमुख्याध्यापिकेला चांगलचं धारेवर धरत खडसावलं. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केलं. दरम्यान एका लोकप्रतिनिधींशी शाळा प्रशासन अशा प्रकारे वागत असेल तर पालक वर्गाशी ते कसे बोलत असतील याचा विचार करा असा सवाल आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार असून शाळा प्रशासनाने अयोग्य पद्धतीने फी वाढ केल्याचं गणपत गायकवाड यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading