कळव्यातील कृष्णाई हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर पडून एक महिला जखमी

कळव्यातील कृष्णाई हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर पडून एक महिला जखमी झाली आहे. काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. मनिषानगर येथील तळ अधिक ४ मजली असलेल्या २५ वर्ष जुन्या इमारतीत तळमजल्यावर कृष्णाई हॉस्पिटल आहे. डॉ. श्रीकांत बाभुळगावकर यांचे हे हॉस्पिटल असून या हॉस्पीटलच्या छताचे प्लास्टर पडले. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करणा-या संध्या पाडेकर या ६८ वर्षीय महिलेला हाताला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading