सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत आज सकाळी विद्यार्थी लिफ्टमध्ये अडकल्याने काही वेळ खळबळ

सुलोचनादेवी सिंघानिया शाळेत आज सकाळी विद्यार्थी लिफ्टमध्ये अडकल्याने काही वेळ खळबळ उडाली. सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील लिफ्टमध्ये आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थी लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. मुलांची संख्या जास्त झाल्यानं लिफ्ट ओव्हरलोड झाली आणि त्यामध्ये विद्यार्थी अडकले होते. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं तातडीनं धाव घेऊन मदतकार्य केलं. यामध्ये सातवीतील शौनक टकले आणि श्रेयस बडगुजर या दोघांना अस्थमाचा त्रास असल्याने लिफ्टमधून बाहेर काढून प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. यामध्ये कोणालाही इजा दुखापत झालेली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading