नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते ११ डिसेंबरला

नागपूर ते मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे. या महामार्गावरील दहा समृद्ध जिल्ह्यांचा वेगवान प्रवास भविष्यात पाहायला मिळेल. हिंदुहृदयसम्राट   बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला असून पुढील शिर्डी ते ठाणे हा टप्पाही लवकरच पूर्ण होऊन जनतेला या महामार्गाचा उपयोग करता येणार आहे नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र  समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका या गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमनेगाव यांना जोडणारा महामार्ग असून यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे एकमेकांशी जोडून दळणवळण गतिमान होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या समृद्धी महामार्ग प्रकल्पामुळे राष्ट्रीय दळणवळण आणि मालवाहतूक  सुविधेत 6% योगदान मिळण्याची अपेक्षा आहे

मुंबई ते नागपूर 812 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 14 तास लागतात. समृद्धी महामार्ग मुळे हे अंतर पार करण्यासाठी 8 तास लागतील. 701 किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे.

औरंगाबाद हे मध्यावर आहे. त्यामुळे औरंगाबाद ते नागपूर जाण्यासाठी 4 तास आणि औरंगाबाद ते मुंबई जाण्यासाठी 4 तास लागतील.

हा मार्ग राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग आहे.

50 हून अधिक उड्डाणपूल, 24 इंटरचेंजेस असतील. हे इंटरचेंजेस वाहनांसाठी एक्झिट पॉईंट असतील. दर पाच किलोमीटरवर अत्यावश्यक टेलिफोनची सुविधा असेल. फूड प्लाझा, रेस्टॉरंटस्, बस वे , ट्रक टर्मिनस, ट्रॉमा सेंटर या महामार्गावर असतील. समृद्धी महामार्गावर वायफायची सुविधा असेल. तसेच ट्राफिक कंट्रोलसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. हे वैशिष्टय आहे, यातून कृषी व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading