सुर्या डॅम मधून मिळणारे पाणी ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी देण्याची प्रताप सरनाईकांची मागणी

पालघर जिल्ह्यामध्ये सुर्या डॅमच्या माध्यमातून मिरा-भाईंदर महापालिकेला लोकसंख्येचा विचार करून २१८ दशलक्ष लिटर आणि वसई-विरारला १८५ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय शासन स्तरावर निश्चित करण्यात आला आहे. सुर्या प्रकल्पातून ४०३ दशलक्ष लिटर पाणी मिळविण्याच्या प्रकल्पाचे काम एमएमआरडीएच्या आणि एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून चालू आहे. तीन महिन्यामध्ये जून, २०२३ ला वसई-विरार ला १८५ दशलक्ष लिटर तर एप्रिल २०२४ ला मिरा-भाइर्दरला २१८ दशलक्ष लिटर पाणी देण्याचे एमएमआरडीए चे उद्दिष्ट असून त्या ठिकाणी जागेवर काम देखील चालू आहे. एमएमआरडीएच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार आज जरी ४०३ दशलक्ष लिटरचे काम चालू असले तरी भविष्यातील पाण्याचा विचार करता ७०७ दशलक्ष लिटर पाणी जमविण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. लवकरच दोरजे धरणातून २५० दशलक्ष लिटर पाणी या ठिकाणी जमा होणार आहे. त्यापैकी पालघर जिल्ह्यातील सिडकोच्या प्रकल्पासाठी ५० दशलक्ष लिटर पाणी हे सिडकोने मागितले असून उर्वरीत २०० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी सुध्दा अनेक संस्थांनी केलेली आहे. ठाणे महानगरपालिकेचा विचार केला असता दिवसेंदिवस माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये घोडबंदर रोडवर झपाट्याने वाढत असलेल्या बांधकामांमुळे लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सातत्याने घोडबंदर रोडवर पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असतात. त्याचबरोबर काळू आणि शाई धरण होण्यासाठी जास्त कालावधी लागणार असल्याने ठाणे महानगरपालिका हद्दीतील घोडबंदर रोड, टिकुजिनी वाडी, वसंत विहार, शिवाईनगर, म्हाडा वसाहत, शास्त्रीनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर मध्ये सातत्याने होत असलेल्या पाणी टंचाईवर सुर्या प्रकल्पामध्ये दोरजे धरणातील २५० दशलक्ष लिटर पाण्यापैकी २०० दशलक्ष लिटर पाणी या परिसरासाठी देण्याचे धोरण निश्चित करावे. तसेच या प्रकल्पामध्ये मिरा-भाइर्दर शहराकरिता पाणी आणण्यासाठी घोडबंदर रोड येथील चेना गाव येथे पाण्याची मोठी टाकी निर्माण करण्यात येत आहे. या टाकीतून मिरा-भाइर्दरला २१८ दशलक्ष लिटर आणि ठाणे महापालिका क्षेत्रासाठी २०० दशलक्ष लिटर पाणी तांत्रिकदृष्ट्या वितरीत करता येऊ शकेल. फक्त त्या टाकीमधून ठाणे महापालिका हद्दीमध्ये पाणी वितरीत करण्यासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम करावे लागत असल्यामुळे हे काम करणे महापालिकेला सोप्पे होईल. यासाठी राज्याचे जरी मुख्यमंत्री असलात तरी ठाण्याचे आमदार या नात्याने आपण पुढाकार घेऊन सर्व संबंधित अधिका-यांसह एका बैठकीचे आयोजन करून याबाबतीतला निर्णय घ्यावा अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading