ठाण्यातही ठिकठिकाणी योग दिन साजरा

जगभर आज योगा दिन साजरा करण्यात आला. ठाण्यामध्येही ठिकठिकाणी योगा दिन साजरा करण्यात आला. अन्यायातील सोहळा हा सेवा रस्त्यावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या योगा केंद्राचेही अनावरण भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थित त्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिक केली. जिल्हा शासकीय रुग्णालयातही योगा दिन साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा योगा दिन साजरा केला. या निमित्ताने योगाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. डॉ. अर्चना पवार यांनी विविध आसनांवर यावेळी मार्गदर्शन केलं जिल्हा शासकीय रुग्णालयात 2015 पासून योगा दिन साजरा केला जात आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातही जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. श्वेता वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसन करण्यात आले. यावेळी कामावर असताना तणावमुक्त राहण्यासाठी कोणती आसनं करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading