सुमारे ८ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळून जाणा-या आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश

सुमारे ८ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पळून जाणा-या आरोपीला अवघ्या दोन तासात मुद्देमालासह अटक करण्यात नौपाडा पोलीसांना यश आलं आहे. नौपाडा येथील आयसीआयसीआय बँकेतील लॉकरमध्ये सुमारे ८ लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी तक्रारदार आणि त्यांची पत्नी रिक्षातून गेले होते. परंतु रिक्षातून उतरल्यानंतर दागिन्यांची बॅग घेण्याआधीच रिक्षा चालकाने सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरी करून तो पळून गेला. याबाबतची तक्रार त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणावरून रिक्षा चालक शिवप्रसाद गुप्ताला शिताफीने पकडून त्याच्याकडील संपूर्ण मुद्देमाल आणि रिक्षा हस्तगत केली. यामध्ये सुमारे ८ लाखांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रूपये किंमतीची रिक्षा असा साडे नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नौपाडा पोलीसांना यश आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading