सिंघानिया हायस्कूलच्या पदपथावरील महापालिकेच्या आर्ट गॅलरीची दुर्दशा

सिंघानिया हायस्कूलच्या पदपथावरील आर्ट गॅलरी पुन्हा सुरू करावी अशी मागणी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठाननं पालिका आयुक्तांना केली आहे. दोन वर्षापूर्वी ठाणे महापालिकेनं मोठ्या उत्साहानं ही आर्ट गॅलरी सुरू केली होती. मात्र आज या आर्ट गॅलरीची दुरावस्था बघून नाराजीची भावना निर्माण होत आहे. पालिकेनं या आर्ट गॅलरीसाठी अद्यावत अशी उपकरणं, खांब, एलईडी लाईटस्, उत्तम दर्जाच्या लाद्या, फोटो अथवा चित्र लावण्यासाठी अद्यावत डिस्प्ले लावण्यासाठी मोठा खर्च केला होता. पण या गॅलरीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं सध्या ही गॅलरी गर्दुल्यांचा झोपण्याचा अड्डा झाला आहे. लाईटस् चोरीला गेले आहेत. वायर्स तोडल्या असून गॅलरीचं नावही तोडण्यात आलं आहे. भिंतींवर कार्टुन्स काढून ठेवण्यात आली आहेत. गॅलरीच्या सध्याच्या या अवस्थेमुळं नाराजी निर्माण झाली असून पालिकेच्या पैशाचा विपर्यास आणि गैरवापर होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ही गॅलरी पुन्हा सुरू करावी आणि तिची योग्य ती देखभाल करून ती कलाकारांसाठी उपयोगात आणावी अन्यथा या गॅलरीची जबाबदारी आनंद दिघे युवा प्रतिष्ठानवर सोपवावी अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी पालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading