बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी सिध्दीविनायक मंदिरासमोर स्वाक्षरी अभियान

बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमणाकडे अतिक्रमण विभाग आणि वाहतूक शाखेचं लक्ष वेधण्यासाठी काल सिध्दीविनायक मंदिरासमोर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं. ठाणे महापालिकेनं आपल्या रस्ता रूंदीकरण मोहिमेअंतर्गत बाजारपेठ रस्ता रूंद केला होता. बाजारपेठ रस्त्याप्रमाणेच खारकर आळी, कडबा गल्ली, महागिरी, जांभळीनाका आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनधिकृत फेरीवाले आणि विरूध्द दिशेनं येणा-या दुचाक्या, रिक्षा त्याचप्रमाणे बाजारपेठ रस्त्यावरून सुरू केलेली परिवहन सेवेची वाहतूक यामुळं रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळं या रस्त्यावरून चालणंही मुश्कील झालं आहे. याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. या रस्त्यावर यामुळं अनेक लहान सहान अपघातही झाले आहेत. याप्रकरणी वारंवार तक्रारी करूनही अतिक्रमण विभाग अथवा वाहतूक शाखेनं लक्ष न घातल्यामुळे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी काल ही स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. यावेळी अनेक पादचा-यांनी आपल्या स्वाक्ष-या करून या अभियानाला आपला पाठिंबा दर्शवला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading