सावित्रीदेवी थिराणातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे व्याख्यान

रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट आणि मराठी विज्ञान परिषद यांचे संयुक्त विद्यमाने सावित्रीदेवी थिराणातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दा.कृ.सोमण यांनी मानवाच्या आकाशात आणि अंतराळात जाण्याच्या प्रयत्नांचा रंजक इतिहासाचे वर्णन केले. राईट ब्रदर्सच पहिले विमान, रशियाने पाठविलेला पहिला उपग्रह स्पुटनिक, अवकाशात पाठविलेली पहिली श्वान लायका, पहिला मानव युरी गागारीन, चंद्रावर पहिले पाऊन टाकणारे निल आर्मस्ट्राँग या आणि इतर उद्बबोधक माहिती त्यांनी दिली. त्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमांचा आढावा घेतला. 1969 मध्ये झालेली ईस्त्रोची स्थापना, अवकाशात पाठवलेला पहिला उपग्रह आर्यभट, अंतराळात गेलेला पहिला भारतीय कॅप्टन राकेश शर्मा, चांद्रयान-1, मंगळयान, चांद्रयान-2 आणि आताचे चांद्रयान-3 अशी वेगवेगळया टप्यांवर भारताने केलेल्या प्रगतिची त्यांनी सविस्तर माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेची मॉडेल्स, फोटो, आकृत्या, चित्रफितीद्वारे मनोरंजकरित्या आणि सहज सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली. दा.कृ. सोमण यांच्या भाषण शैलीत विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे स्वरुप चर्चात्मक असल्याने विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग घेतला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading