डॉ. बेडेकर विद्या मंदिर माध्यमिक विभागात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

शिक्षक दिन ५ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा केला जातो . शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी डॉ. बेडेकर विद्या मंदिर माध्यमिक विभागात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला. शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.अगदी तसाच अनुभव शाळेतील इयत्ता दहावीच्या आणि नववीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. इयत्ता दहावीच्या आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी याही भूमिकेत काही विद्यार्थी वावरत होते. थोडक्यात 5 सप्टेंबर या दिवशी सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांनी चालवली. शिकवणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी आणि शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. शाळेच्या वेळामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले ,त्यानंतर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले नंतर विद्यार्थ्यांच्या मनोगताचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्माना करिता त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading