सावरकरनगर मधील सोन्या-चांदीच्या दुकानातून २ लाखाचे दागिने लंपास

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने सावरकर नगर येथील यश ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीतून तब्बल २ लाखांचे दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. भरतकुमार मुद्रेचा यांचं सावरकर नगर येथील आईमाता मंदिराजवळ यश ज्वेलर्स हे दुकान आहे. मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास दुकानात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीनं सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला. दागिने पाहत असतानाच सराफाची नजर चुकवत ५ सोनसाखळी एकत्र घेऊन त्याने दुकानाबाहेर काढता पाय घेतला. दुकानाचे मालक भरतकुमार यांना चोरी केल्याची शंका आल्यानं त्यांनी चोर चोर करत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण दुकानासमोर आधीच सज्ज असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून चोरट्यानं धूम ठोकली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading