सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी – नरेश म्हस्के

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाही संपूर्णत: मंडप भाडे माफी द्यावी अशी लेखी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी शहरात गणेशोत्सव साजरा केला जातो. ही सर्व मंडळे वर्षभर समाजोपयोगी अशी कामे करीत असतात. तसेच शहरामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीमध्ये देखील सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि सदस्य हिरीरीने सहभाग घेवून हातभार लावत असतात. मागील दोन ते तीन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी आदी कारणांमुळे या मंडळांची आर्थिक परिस्थिती सक्षम राहिलेली नाही. मागील दोन ते तीन वर्षे महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे माफ करण्याबाबत शिवसेनेच्यावतीने आपण पुढाकार घेतला होता, त्यानुसार महापालिकेने देखील सकारात्मक भूमिका घेवून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी मंडप भाडे माफ केले असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले याच पार्श्वभूमीवर वरील सर्व बाबींचा विचार करुन यावर्षी देखील सार्वजनिक गणेशमंडळांना संपूर्णत: मंडप भाडे माफ करण्याबाबत निर्णय घेवून दिलासा द्यावा अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading