राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाच काम 26 सप्टेंबरपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातील नुतनीकरणाच्या कामाचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा घेतला. ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृह नुतनीकरणाचे काम सुरू असून या कामाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अधिका-यांसमवेत केली. वसतीगृहाच्या खोल्यांची रचना कशी असेल यासाठी अद्ययावत अशी एक रुम तयार करण्यात आली आहे. या रुमची पाहणी करीत असताना वसतीगृहातील इतर रुमही अशाच पध्दतीने तयार कराव्यात. तसेच येत्या 26 सप्टेंबरपर्यत सर्व कामे पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कळवा राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतीगृहाच्या इमारत नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. वसतीगृह हे दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल या दृष्टीने जास्तीचे मनुष्यबळ वापरुन काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. वसतीगृहाचे काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे, त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम, स्लॅब आदीची डागडुजी करताना वापरण्यात येणारे साहित्याचा दर्जा हा अत्युच्च असावा. तसेच इमारतीतून गळती होणार नाही या दृष्टीने काम करण्याच्या सूचना आयुक्तयांनी दिल्या. पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या रुममध्ये दोन बेडस्, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आले असून या संपूर्ण खोलीची पाहणी यावेळी करण्यात आली. या वसतीगृहात एकूण 53 रुम असून प्रत्येक रुममध्ये दोन विद्यार्थी अशा एकूण 106 विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांची सोय होणार आहे. येत्या 26 सप्टेंबरपर्यत सर्व कामे पूर्ण होणे आवश्यक असले तरी वापरण्यात येणारे साहित्य आणि कामाचा दर्जा हा अत्युच्च राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त बांगर यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading