सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करणा-या आरोपीला अवघ्या १० तासात जेरबंद करण्यात पोलीसांना यश

सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाचे ठेचून हत्या करणा-या आरोपीस भिवंडी पोलीसांनी अवघ्या १०
तासात जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. भिवंडीतील बीबीसी टेक्सटाईल कंपनीसमोरील मोकळ्या मैदानात एका सात
वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिने कोणास काही सांगू नये म्हणून या बालिकेच्या डोक्यात दगड टाकून तिला
जिवे ठार मारण्याचा प्रकार घडला होता. या आरोपीबाबत कोणतीही माहिती अथवा सुगावा नसताना भिवंडी पोलीसांनी
सहा वेगवेगळी पथकं तयार केली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे भिवंडी परिसर पिंजून काढून भरतकुमार कोरी या हमाली
करणा-या आरोपीस अवघ्या १० तासात पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading