सर्व कर संकलन केंद्र शनिवारीही सुरू राहणार

२०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर नागरिकांना वेळेत भरता यावेत यासाठी महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालये आणि उपप्रभाग कार्यालये ३१ डिसेंबर पर्यंत सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांना मालमत्ता कर मुदतीत भरणे सोईचे व्हावे याकरिता सर्व प्रभाग, उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र तसेच नागरी सुविधा केंद्रामधील कर संकलन केंद्र ३१ डिसेंबर पर्यंत सर्व शनिवारी आणि २५ डिसेंबर रोजी नाताळ निमित्त असलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
तसंच www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा असून महापालिकेच्या डीजीठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे देखील मालमत्ता कर जमा करण्याची अतिरिक्त सुविधा उपलब्ध आहे. सर्व मालमत्ताधारक नागरिकांनी आपला कर वेळेत भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading