सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारतीतील नव्या वर्गांचा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शुभारंभ

ठाण्यातील सुपरिचित असलेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नूतन इमारतीतील नव्या वर्गांचा गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शुभारंभ करण्यात आला. गेल्या वर्षी ६ आणि ७ एप्रिलला या शाळेच्या जुन्या इमारतीला निरोप देण्यात आला होता. त्यानंतर ५ मे ला या शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक टिळक यांच्या हस्ते नूतन इमारतीची पायाभरणी झाली होती. एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना आपल्या गुणवत्तेच्या जोरावर सरस्वती शाळा पूर्वीच्याच दिमाखानं उभी आहे. एक वर्षाहून कमी काळात संस्थेनं नवीन शाळेची ६ मजली इमारत पूर्ण केली आहे. सध्या वर्गाच्या आतील काम सुरू असून या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाचे वर्ग नवीन इमारतीत सुरू केले जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading