ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांच्या मत देण्याची ६१ कारणे या पुस्तकाचं प्रकाशन

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या मत देण्याची ६१ कारणे या पुस्तकाचं प्रकाशन उद्योजिका आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. मतदार जागृती आणि प्रबोधन करणा-या या पुस्तकात आर्थिक, प्रशासकीय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक पुनर्जीवन, आंतरराष्ट्रीय, अंत्योदय, उद्योग आणि रोजगार, संरक्षण, शेती, महिला, तरूणाई आणि शिक्षण या १० मुद्यांच्या आधारे गेल्या ५ वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या महत्वाच्या ६१ कामांची माहिती डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली आहे. मतदान करताना मतदारांनी नोंद घेण्याच्या ६१ मुद्यांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे. दिनदयाळ प्रेरणा केंद्रानं या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading