सरस्वती मंदिर ट्रस्टची पुस्तक भेट योजना

सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये दिवाळीच्या निमित्ताने मराठीतील नामांकित १० प्रकाशकांनी ‘वाचन जागरण महोत्सव’ आयोजित केला आहे.या उपक्रमांतर्गत निवडक पुस्तकांवर २५% सवलत या प्रकाशकांनी जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन पुस्तक भेट योजना सरस्वती मन्दिर ट्रस्ट ने जाहीर केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेची नूतन वास्तू , नव्या रंगात आणि डौलात विद्यार्थ्यांची आतुरतेने वाट बघत आहे. शाळेच्या या नूतन वास्तूत, विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. अद्यावत वर्ग खोल्या हे तर शाळेचे वैशिष्ट्य असणारच आहे, त्या बरोबर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र, सुसज्ज आणि संपन्न ग्रंथालये, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. सरस्वती सेकंडरी स्कूलच्या आजी माजी विद्यार्थी, शिक्षक,पालक आणि हितचिंतक यांना धनादेश अथवा पुस्तक रूपाने भेट देण्याचं संस्थेने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी २५४०१२३० आणि ९००४१३५४८५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading