कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगर क्षेत्रातील विकासकामांचा खासदार श्रीकांत शिंदेंंकडून आढावा

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ठाणे महानगर क्षेत्रातील विकासकामांचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल आढावा घेतला. यावेळी दिवा आणि खारेगाव येथील रेल्वे उड्डाण पूल, आगासन देसाई उड्डाण पूल, दिवा-दातिवली-आगासन या रेल्वे स्थानकांच्या रूळाखालून पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे सादरीकरण त्यांच्यासमोर करण्यात आलं. खारेगाव येथील रेल्वे उड्डाण पूलाचं काम ८६ टक्के पूर्ण झालं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. येत्या एप्रिलपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं. दिवा येथील रेल्वे उड्डाण पूलाच्या संदर्भात साडेतीनशे कुटुंबांचं तात्काळ पुनर्वसन करण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या. पुढील वर्षभरात हा पूल पूर्ण होईल असं नियोजन करावं असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. दिवा पश्चिमेतील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे रूळाखालून पुश थ्रो पध्दतीनं काम केलं जाणार असून हे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचनाही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading