जिल्ह्यात आज कोरोनाचे ६३४ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६३४ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार २४० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ५ हजार ५६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ९ हजार ७८५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण २ लाख २१ हजार ५३२ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या १ हजार ४१३ रूग्ण उपचार घेत असून ४६ हजार ८३६ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २०५ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ हजार १७५ रूग्ण उपचार घेत असून ५० हजार ३० बरे झाले तर १ हजार ३५ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ हजार १८४ रूग्ण असून ४४ हजार ४८५ बरे झाले तर ९५० दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये ५२९ रूग्ण उपचार घेत असून २२ हजार २४४ कोरोनातून बरे झाले तर ७५० जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ३५० रूग्ण असून ९ हजार ८६९ बरे झाले तर ३४९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये १६५ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ६२७ कोरोनातून बरे झाले तर ३४० जणं दगावले. अंबरनाथमध्ये १६० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ७ हजार २२३ बरे झाले तर २८४ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये १२२ रूग्ण असून ७ हजार ५२० कोरोनामुक्त झाले तर ९८ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार १४२ रूग्ण असून १५ हजार ९५१ बरे झाले तर ५५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading