सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ३५ चाळींमधील साडेतीनशे खोल्या जमिनदोस्त

सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ३५ चाळींमधील साडेतीनशे खोल्या काल जमिनदोस्त करण्यात आल्या. दिवा येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या घरांवर महापालिकेनं केलेल्या कारवाईस काल रहिवाशांनी घेराव घालून तीव्र विरोध केला होता. दिवा येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवर न्यायालयानं कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ९ डिसेंबरला कारवाई करण्यात येणार होती. पण त्यावेळीही रहिवाशांच्या विरोधामुळं कारवाई बारगळली होती. या शासकीय जमिनीवर साधारणत: ३५० घरं बांधण्यात आली आहेत. महापालिकेनं काल सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता रहिवाशांनी घेराव घालून या कारवाईला विरोध केला. पण मोठा पोलीस बंदोबस्त लावून न्यायालयाच्या आदेशानुसार ही घरं जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे या घरांमधून राहणारी कुटुंबं बेघर झाली. त्यामुळं त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. बांधकामं सुरू असतानाच कारवाई का केली गेली नाही, त्यावेळी कोणाला हे दिसलं नाही का असे प्रश्न या मंडळींकडून उपस्थित केले जात होते. जिल्हाधिका-यांनी या ठिकाणी बांधकाम करणा-या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading